जगप्रसिद्ध चितळे ची उत्पादने आता सीवूड्स, नेरूळ बेलापूर, सानपाडा अर्थातच नवी मुंबईकरांना सहज उपलब्ध होणार आहे. चितळे एक्सप्रेसची शाखा ग्रँड सेंट्रल मॉल समोर अगदी मोक्याच्या ठिकाणी सुरू झाली आहे.चितळे उद्योगसमूहाची सर्व उत्पादने एकाच छताखाली आता सीवूड्स मध्ये मिळतील,कारण चितळे एक्सप्रेस स्टोअर सीवूड्स ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी स्टोअरचे उद्घाटन सन्मा. पद्मश्री.उज्वल निकम (विशेष सरकारी अभियोक्ता) आणि चितळे परिवाराच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब शिंगाडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दशरथ शिंगाडे , नगरसेवक परिषदेचे कार्याध्यक्ष संजू वाडे, इंद्रनील चितळे, केदार चितळे, गिरीश चितळे, अनंत चितळे उपस्थित होते.
“चितळे उद्योगसमूहाच्या ह्या नवीन व्हेंचरला भेट देऊन, आपल्या आवडत्या सर्वच चितळे पदार्थांचा आस्वाद घ्या!. डेरी, आईस्क्रीम, नमकीन, स्वीट्स अशी जगप्रसिद्ध ब्रँडची उत्पादने आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत.मला आनंद आहे अशी माहिती पत्रकारांना या शाखेचे मालक सागर ज्ञानदेव कळाणे यांनी दिली.
चितळे एक्सप्रेस चा पत्ता आहे श्री रामकृष्ण , दुकान क्रमांक १५, प्लॉट क्रमांक-४६/४७,सेक्टर-४०, ग्रँड सेंट्रल मॉलजवळ, सीवूड्स (पश्चिम).