कामोठेकरांनि पाणी टंचाई होत असल्याने सिडको प्रशासनाला शेकापच्या नेतृत्वाखाली धारे वर धरले…
सिडको फलकाला पादत्राणे हार घालून जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आले

प्रतिनिधी :-(गुरुवार दि .21 जुलै)
शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील सिडको पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा धडकला असून माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे व नगरसेवक सखाराम पाटील , गौरव पोरवाल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला .

शंकरशेठ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शिष्टमंडळाने मागणीचे पत्र ही देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी आश्वासन देत येत्या आठ दिवसांमध्ये वरिष्ठांशी बैठक करून पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .
यावेळी उपस्थित अमोल शिंतोडे, महिला अध्यक्षा झणझणे मॅडम, महिला उपाध्यक्षा शुभांगी खरात,गीता कुंडे, सत्रेताई,युवक अध्यक्ष कुणाल भेंडे , भरत पनवेलकर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
