प्रतिनिधी साबीर शेख
कामोठे कॉलोनी फोरम आणि खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन ह्यांनी पुढाकार घेऊन खारघर अणि कामोठे मधील विविध गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या नागरिकांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पाणी टंचाई बाबत सिडको भवन येथे भव्य आंदोलन उभे केले होते.
1 सप्टेंबर 2021 रोजी सिडको ऑफ़िस येथे कामोठे कॉलोनी फोरम आणि खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाबरोबर सिडको जॉइंट एम डी अणि प्रशासकीय अधिकारींनी सखोल चर्चा केली. तसेच आंदोलकांना सर्व मागण्यांवर मार्ग काढण्याबाबत तसेच लेखी उत्तर देण्याबाबत आश्वासित केले होते.
यासंबंधी सिडकोने कामोठे कॉलोनी फोरमला वरील पत्र पाठवले. पत्रामधील ठळक मुद्दे.
पाण्यासंबंधी त्यांनी सर्वांना आश्वासित केले आहे की जेव्हा जेव्हा कुठल्याही गृहनिर्माण संस्थेला पाण्याची पूर्तता होत नसेल तेव्हा सिडको माफक दरात टँकर पोहोचवण्यास बांधील असुन शुल्क पाणी बिलमधे निवासी दराने आकारण्यात येईल. टँकर भाडे अणि वाहतुक शुल्क आकारण्यात येत नाही त्यामूळे कोणीही नगदी पैसे देऊ नये.
तसेच आपल्या मागणीनुसार कामोठे सेक्टर 21 येथील जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले असुन सिडकोकडून 3 वर्षात बांधून पुर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
कामोठे शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे मोरबे धरणातून 90 एम एल डी पाण्याची मागणी करण्यात आली असुन तसा प्रस्ताव राज्य शासनास पाठविल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.
तरीसुद्धा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेपर्यंत कामोठे कॉलोनी फोरम शांत बसणार नाही.