पनवेल तालुक्यातील करंजाडे प्रीमियर क्रिकेट लीगच्या स्पर्धेला रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत साहेब यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत होते.तरुणांना आवड असलेल्या क्रिकेट, कब्बड्डी, शरीरशौष्ठव स्पर्धाच्या आयोजनासाठी रायगड जिल्हा काँग्रेस चे डॅशिंग, कार्यतत्पर अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या कडे पाहिले जात आहे.
सिडकोच्या माध्यमातून सिडको प्रकल्प बाधित गावात प्रत्येक गावासाठी क्रिडांगणे तयार करून घेण्यासाठी गेली 15 ते 20 वर्षे सातत्याने ते स्वतः पाठपुरावा करत आहेत म्हणून महेंद्र घरत हे येथील तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
या ठिकाणी तीन लोकप्रतिनिधी आमदार आहेत यांना एकदा सिडको कडे पाठपुरावा करायला सांगा.त्यांच्या कडुन जर काही प्रयत्न झाले नाही तर मग मी स्वतः लक्ष घालुन किंबहुना सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांच्या छाताडावर बसुन तुम्हाला मैदान सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि आयोजकांनी रायगड जिल्ह्याचे डॅशिंग आणि कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्र घरत साहेबांचे आभार मानले.