सध्याची ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटबाबत दक्षता घेण्याची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक पूर्वतयारीच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. अशामध्ये शिक्षण विभागाकडून 25 नोव्हेंबर रोजी पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा राज्यभरात सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र शिक्षण विभाग 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत ठाम होते याबाबत शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला होता. या शासन निर्णयाची वाट विद्यार्थी, शिक्षक, पालक व महापालिका, नगरपालिका शिक्षण अधिकारी, आयुक्त सर्वच जण पाहत होते.
पण या ओमायक्रॉन कोरोना विषाणूचा प्रभाव मात्र जास्त असण्याचे शंका संभवत असल्याने या व्हेरिएंटबाबत दक्षता घेण्याची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक पूर्वतयारीच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात येतील असे निर्देश पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शिक्षण विभागास दिले आहेत.
त्याचधर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुद्धा 15 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात येतील असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिक्षण विभागास दिलेले आहेत.
शाळे शिक्षण साठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना अजून वाट पाहायला लागेल.