सामाजिक संघटना, लोक प्रतिनिधी, महापालिकेच्या प्रयत्नातून आदई तलाव परिसर स्वच्छ
दिनांक १२ रोजी प्रभाग समिती ब अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील आदई तलाव येथे स्थायी समिती सभापती श्री.संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.या मोहिमेत विविध 35 सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर स्वच्छता मोहीमेच्या वेळी पनवेल महानगर पालिकेच्या महापौर कविता चौतमाल, सभागृह नेते परेश ठाकूर ,आयुक्त गणेश देशमुख , उपायुक्त गणेश शेट्टे , सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, स्वच्छ भारत अभियानच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे, कनिष्ठ सल्लागार सदाकत अली अन्सारी, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरिक्षक अजिंक्य हळदे, पर्यवेक्षक संतोष गायकवाड, संदीप कांबळे, साई गणेशचे व्यवस्थापक राकेश भुजबळ, सुपरवायजर चिन्मय घरत
या स्वच्छता मोहिमेतून आदई तलाव व परिसरातून अंदाजे 10 टन कचरा गोळा करण्यात आला. नागरिकांनी कचरा, निर्माल्य तलावात न टाकता येते ठेवण्यात आलेल्या मोठ्या कलशांमध्ये टाकावे जेणे करून तलाव आणि परिसर स्वच्छ राहील, असा संदेश यावेळी सर्व उपस्थितांनी दिला.
यावेळी महापालिकेच्या वतीने उपस्थित सर्व सामाजिक संस्थांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वांचे आभार मानण्यात आले.