नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा,अन्यथा तीव्र आंदोलन:- प्रितम म्हात्रे

कोकण डायरी

नवीन पनवेल सेक्टर 1/S नागरी वस्तीमध्ये मधोमध पनवेल महानगरपालिकेचे कचरा वर्गीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी नवीन पनवेल इतर परिसरातील सर्व कचरा आणला जातो आणि तिथे कचरा जमा केला जातो. त्यानंतर त्याची विल्हेवाट त्वरीत लावणे आवश्यक आहे पण ते केले जात नाही. अशा तक्रारी सदर परिसरातील रहिवाशांनी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडे केल्या होत्या.

या कचरा वर्गीकरण केंद्राची पाहणी केली असता कचरा वर्गीकरण न-करता कचरा साठविला जात असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. परिसरात मोठी लोकवस्ती असून दुर्गंधी, डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांना कळविले व तात्काळ सदरचा साठविलेला कचरा उचलण्यास सांगितले . भविष्यात जर आरोग्याच्या बाबतीत काळजी न घेता नागरिकांचा जीव धोकात घरात असाल तर  राहिवासीयांसमवेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.