*भाजप अल्पसंख्यांक मोर्चा रायगड व पनवेल अल्पसंख्याक समाजाच्या च्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत
पनवेल प्रेरणा गावंड:-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशप्रेम व्यक्त करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता पनवेलच्या सुप्रसिद्ध असणारे पवित्र आस्था स्थान हजरत ख्वाजा पीर करमअली शाह दर्गेवर एकाचवेळी अनेक मुस्लिमबांधव व भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायले गेले.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव देश भरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.
अल्पसंख्यांक समाजाने देशभरात मस्जिद मदरसा दर्गा अशा सर्व व्यवस्थापना नियोजनात “हर घर तिरंगा” अभियान देश एकता महानता या ध्येयाने अमृत महोत्सवि क्षण म्हणून घरावर तिरंगा फडकवून साजरा केला .
‘स्वातंत्र्याचा सण हा साजरा करून देशातील विविध जाती, धर्म ,पंथ, समूह, संघटना एकत्र येऊन , घरोघरी तिरंगा अभिमानाने देश सन्मानात फडकविला
अल्पसंख्यांक समाजातील रायगड जिल्ह्यातील नेते सय्यद अकबर
प्रदेश उपाध्यक्ष,भाजप अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात आले त्यात आज पनवेल येथील हजरत ख्वाजा पीर कमर आली शहा दर्गेवर मुस्लिम बांधव एकत्रपणे येऊन देशाच्या राष्ट्र प्रेमाचं व अमृत महोत्स क्षणाचं औचित्य साधून सामूहिक राष्ट्रगीत गायले व भारत माता की जय या घोषणाही देण्यात आल्या.
साधू ,संतांची ,पिरांची भूमी असलेला महाराष्ट्र आपल्या संस्कृतीत राष्ट्रप्रेम म्हणून सर्वप्रथम कर्तव्यात सर्व परी म्हणून महत्त्व ठेवत असतो.
अल्पसंख्यांक समाज म्हणून धार्मिक संस्था अश्या विविध ठिकाणी व्यवस्थापनेने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या आनंदात जल्लोषात, मादरे वतन जिंदाबाद अशा घोषणा देत साजरा केला.
आज पनवेल या ठिकाणी सय्यद अकबर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सदभावना ,एकता, संस्कृती आस्था या सर्व विषयांवर समाजात, एकतेचा संदेश देणारा उद्देश होता म्हणून हम सब एक है हा नारा देत सय्यद अकबर यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले