पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात दिनांक 26 नोव्हेंबर 2021, शुक्रवार संविधान दिवसानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमास सन्मानीय महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.