कॉलनी फोरमच्या अध्यक्षा सौ. लीना अर्जुन गरड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन
पनवेल महानगरपालिकेच्या 61 जागांवर कॉलनी फोरमचे उमेदवार निवडणूक लढवणार

प्रतिनिधी;- साबीर शेख
कॉलनी फोरम च्या वतीने खारघर येथील लँडमार्क बिल्डिंग मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या सर्व लोकप्रतिनिधी ची ८ जुलै रोजी पर्यंत ची मुदत काल संपली. अंतिम सभा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे राजकीय बिगुल सर्वत्र वाजल्याने कॉलनी फोरम आगामी निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या कल्याणासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर झाले.
कुठल्याही गटतठात न जाता ,पक्ष ,भेद वाद न करता स्वबळावर येणाऱ्या निवडणुकिला फोरम सामोरे जाईल.
शैक्षणिक दृष्ट्या सक्षम ,समाज बांधिलकी जपणारा ,जन कल्याणासाठी संघर्ष करणारा उमेदवार फोरमच्या माध्यमातून उमेदवार म्हणून जनतेसमोर असेल.
मतदाराला निवडलेल्या लोकप्रतिनिधीतून समाज हित कसं साधता येईल असा विचार करून कॉलनी फोरम पनवेल ६१ जागेवर आगामी निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषदे मध्ये लीना गरड यांनी जाहीर केले.
महापालिका हद्दीतील असंख्य प्रश्न प्रलंबित असताना प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या सुख सोयीसाठी प्राथमिकता देणारे सत्ताधारी आम्हाला नको.
कर बाबत असलेली लढाई न्यायप्रलंबित असली तरी ती आम्हीच जिंकू संविधानात्मक कर प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून आम्ही आमची लढाई असंख्य पनवेलकरांच्या सोबत लढत आहोत.
कर दाता भविष्यात निर्माण होणाऱ्या असंख्य अडचणी बाबत चिंता व्यक्त करत असतो. पाणी ,आरोग्य ,शिक्षण, रस्ते अश्या अनेक सुख सोयी अत्यावश्यक गरजा न मिळाल्याने अनेक वर्ष त्रस्त आहे.
सर्वसामान्य करदाता लोकशाहीच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी मधून नसतो म्हणून त्याला आपला आवाज उठवण्यासाठी संविधानिक पद्धतीने न्यायपालिका, निवेदन ,मोर्चा, तक्रार, करताना आपण सर्व हताशपणे पाहतो, पण त्यानंतर एकच पर्याय असतो ते म्हणजे स्वतः सक्षम होऊन संघटित होऊन लोकशाहीच्या मैदानामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जाण्याचा आणि तो पर्याय फोरम जन इच्छेने निवडला आहे .
लोकप्रतिनिधींनाच बोलण्याचा, ठराव करण्याचा अधिकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये कॉलनी फोरमचा उमेदवार पनवेलकरांच्या सर्वसामान्य मधील असेल, लोकप्रतिनिधी म्हणून प्राथमिकता म्हणून कुठली कामे समाज व देश हितात करायचे आहे. हे आम्ही कॉलनी फोरमच्या माध्यमातून जनतेच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवू असे कामोठे फोरम अध्यक्ष मंगेश आढाव यांनी सांगितले .
आर्थिक ,स्वार्थापोटी सत्ताधारी सर्वसामान्य व अत्यावश्यक असलेल्या गरजा पूर्ण न करता आपल्या स्वार्थापोटी सर्वसामान्य करदात्यांचा शोषण करत असल्याचे अनुभव मागील काही वर्षापासून पनवेलकर सोसत आहे.
पण आत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या समोर उत्तम योग्यता प्राप्त असलेला लोकप्रतिनिधी कॉलनी फोरमच्या माध्यमातून जनतेच्या समोर दूरदृष्टी ठेवून, आधुनिकता लक्षात ठेवून मतदारांच्या समोर त्यांची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याने नागरिकांच्या अनेक समस्या सोडवणार असल्याची आम्हाला खात्री आहे असे वकील बालेश भोजने यांनी व्यक्त केले.
कॉलनी फोरम नवी मुंबई सारखं आधुनिक , प्रगतिशील शहर बनवण्यासाठी संघर्ष करेल, शहरात 500 हून अधिक बेड असलेलं हॉस्पिटल, मुबलक पाणीसाठा, विद्युत नियमित्ता असण्यासाठी सबस्टेशन्स, परिवहन सेवा ,आधुनिक व सोयीसुविधा असलेले रस्ते व त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केलेले अनेक उपाय योजना ज्याने करदाता आपल्याला दिलेल्या करासाठी समाधानी असेल असा शहर निर्माण करण्याचे स्वप्न फोरमच्या माध्यमातून साकारण्यासाठी पनवेलकरांनी आम्हाला सहकार्य करावे असे अध्यक्ष लीना गरड यांनी आव्हान केले.
पत्रकार परिषदेमध्ये कॉलनी फोरम अध्यक्ष लीना गरड, कामोठे अध्यक्ष मंगेश अढाव,अँड. मधु पाटील अनिता भोसले ,अँड .बालेश भोजने समन्वयक, अँड विधी तज्ञा जी,पी खारगे व अन्य फोरम टीमचे आगामी निवडणुकीतील उमेदवार आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.