कोळखे ग्रामपंचायत सरपंच सौ.मिनलताई रोहन म्हात्रे व
विद्यमान सदस्य रोहन (भाया) लक्ष्मण म्हात्रे यांच्या
संकल्पनेतुन कोळखे गावात छत्रपती शिवाजी महाराज
प्रवेशद्वार…
छत्रपती शिवरायांच्या रायगड या
राजधानीत असे भव्यदिव्य प्रवेशद्वार पनवेलकरांना पहायला मिळेल…
प्रतिनिधी/ साबीर शेख
पनवेल तालुक्यातील कोळखे ग्रामपंचायत प्रवेशद्वार म्हणून स्व. आंबो म्हात्रे या आजोबांच्या स्मरणार्थ
लक्ष्मण आंबो म्हात्रे त्यांच्या मुलाने व रोहन म्हात्रे या नातवाने स्व-खर्चाने हे शिल्प व शिवरायांची मुर्ती या ठिकाणी उभारली.
या कार्याचा कौतुक व गौरव सर्व स्तरातुन करण्यात येत आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये असे कार्य घड्डु शकते याचे उत्तम उदाहरण या म्हात्रे कुटुंबीयांनी करुन दाखवले आहे .
शेकापचे नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान वाटावं कारण छत्रपती शिवरायांच्या रायगड या राजधानीत असे भव्यदिव्य प्रवेशद्वार रायगड जिल्ह्यात
आम्हा पनवेलकरांना बघायला मिळाले ह्याच खूप आनंद वाटतो असे अध्यक्ष रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटना शेकाप देवा पाटील यांनी मत व्यक्त केले .
या कार्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जात जात रोहन म्हात्रे यांनी हे स्वप्न उराशी बाळगुन ते स्वप्न वास्तव्यात उतरवले आहे.
शिवरायांच्या स्वराज्यातील प्रतिकृती ऐतिहासिक वास्तू म्हणून शिवभक्तांना मोठया प्रमाणात आनंदच होणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे विद्यमान सरपंच सौ. मीनल रोहन म्हात्रे यांनी मत व्यक्त केले.