तीन वर्षांनंतर गणेशनगर समोरील सांडपाण्याचा मार्गं मोकळा, रस्त्यावरील खड्ड्यांचे विघ्न सुटणार

माजी सरपंच संदिप मुंढे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांचे योगदान

प्रतिनिधी – (०९/०७)रसायनी

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी -दांड रस्त्यावरील गणेशनगर समोरील रस्त्याच्या उतारावरुन येणारे सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होण्याच्या घटना सुरूच आहेत.यासाठी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी तसेच माजी सरपंच संदिप मुंढे यांनी सदर समस्या लक्षात घेऊन सांडपाणी नाला काढून मार्ग काढला.

वृंदावन फ्लोराकडे जाणारा रस्ता ब्रेकरने फोडून त्याखालून अंतर्गत सांडपाणी नाला काढल्यास सदर समस्या सुटणार होती. अखेर शुक्रवारपासून काम सुरू होवून ब्रेकरच्या साहाय्याने सांडपाणी नाला काढण्यात आला व त्यात सहा मोठ्या व्यासाच्या मो-या टाकण्यात आल्या.
दरम्यान चांभार्ली उतारावरील सांडपाणी, हरिओम पार्क, बाळाजी हाईंट या परिसरातील वसाहतींना पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने सदर सांडपाणी गणेशनगर समोरील रस्त्यावर साचायचे ,परिणामी रस्त्याला खड्डे पडल्याने वाहतूक खोलंबा व्हायचा.

अखेर तीन वर्षांनंतर माजी सरपंच संदिप मुंढे आणि रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या प्रयत्नातून काम पूर्ण झाल्याने उतारावरील सांडपाणी मो-यांवाटे रिस पुलाकडे काढले आहे.

रसायनीकरां समोरील महत्वाची समस्या सोडविण्यासाठी माजी सरपंच संदिप मुंढे आणि रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.