*सामाजिक कार्य केल्या बद्दल नीलिमा पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान*..
सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान.*
पनवेल : सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून “कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा ” वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी दि. 5 एप्रिल 2022 रोजी, दुपारी. 4 वाजता मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल घेत सोनिया महिला मंडळाच्या वतीने “कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मुकेश म्युझिकल मेलोडी (हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा ) या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने ह्या सोहळ्याची शोभा वाढवली. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये समाज कार्य करणाऱ्या नीलिमा पाटील यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुहासिनी केकाणे, उपाध्यक्ष सौ. अंजली इनामदार, सरचिटणीस सौ. नीता माळी, खजिनदार सौ. अस्मिता गोसावी, चिटणीस सौ. म्हात्रे, चिटणीस सौ. निता मंजुळे यांनी उत्तम सोहळ्याचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.