पनवेल महानगपालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिध्द
पनवेल : – महानगपालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे. मुख्यालयातील निवडणुक विभागामध्ये नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना २४ जून दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करण्याची जाहीर सूचना पालिकेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनूसार नव्या प्रारूप रचनेनुसार ३० प्रभाग करण्यात आले आहेत. आधीच्या प्रभाग रचनेनूसार ७८ जागा होत्या आता ११ जागा वाढून त्या ८९ जागा झाल्या आहेत.पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२२मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा आज १३ जून रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. २४ जूनपर्यंत ३ वाजेपर्यंत हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
प्रारूप प्रभाग रचना नकाशे, अधिसूचना व प्रभागांच्या व्याप्ती/चतु:सीमा या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.panvelcorporationcom वरती तसेच पनवेल महानगरपालिका मुख्यालय, प्रभाग समिती ‘अ’खारघर , ‘ब’ कळंबोली, ‘क’ कोमोठे, ‘ड’ पनवेल येथील कार्यालयामध्ये उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी गणेश देशमुख यांनी सूचित केले आहे.
——–////////———-