खारघर कॉलनी फोरमने केली नालेसफाईची पोलखोल*

 

खारघर कॉलनी फोरमने केली नालेसफाईची पोलखोल*

*पोलखोल मालिकेचा चौथा भाग*

*लीना गरड यांनी व्हिडियो काढत बिंग फोडले*

*पूर्ण नालेसफाई झाल्या शिवाय बिले देऊ नये- लीना गरड

खारघर, प्रतिनिधी :- पावसाळ्यापूर्वी पनवेल महापालिकेच्यावतीने नालेसफाई सुरु करण्यात आली.  पण खारघर मधील काही ठिकाणी नालेसफाई फक्त दाखवायला केली गेली असल्याचे आरोप  नगरसेविका लीना गरड ( प्रभाग क्रमांक 5 सेक्टर 12 )यांनी पोलखोल करून दाखवले . त्यांच्यासह समन्वयक मधु पाटील ( प्रभाग क्रमांक 4 सेक्टर 19 ), समन्वयक बालेश भोजने ( प्रभाग क्रमांक 6 सेक्टर 10 )यांनी नाल्यात उतरत  हा संबंधित व्हिडियो काढला . पण अर्धवट केलेली  नालेसफाई  त्यात समोर आली. नालेसफाई करताना फक्त मॅनहोल तसेच नाल्यावरील झाकण खालील सफाई केली आणि नाल्याच्या आतील आजूबाजूला सफाई झाली नसल्याचे आढळले.

पहिला पाऊस येण्याआधी सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्यायला हवे होते मात्र दिखाव्यापुरता काम सुरू असल्याचे लीना गरड आणि त्यांच्या समन्वयकांनी व्हिडियो करत पोलखोल केला आहे.

नालेसफाई मध्ये नाल्याच्या आतमधील गाळ , माती तशीच असल्याने  पावसाळ्यात पाण्याला अडथळा निर्माण होतो. आत मधून काढलेली माती तिथेच बाजूला टाकण्यात येते. आणि तीच माती पुन्हा नाल्यात जाते. नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारी, कमिशन घेणारे बिनदास्त दिसत आहेत.

पूर्ण नालेसफाई झाल्या शिवाय बिले देऊ नये- लीना गरड

नगरसेविका तसेच कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी पूर्ण नालेसफाई झाल्या शिवाय कंत्राटदाराला बिले देऊ नये अशी मागणी केली आहे. फक्त नावापुरता सुरू असलेल्या नालेसफाईचा काय फायदा ? मागील गोष्टींचा धडा घेऊन नालेसफाई केल्यानंतर त्वरित ही माती त्याचबरोबर कचरा उचलून टाकावा असंही त्या म्हणाल्या.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.