जेष्ठ नागरीकांची बतावणी करून फसवणूक करणा-या गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष २ कडुन अटक (एकुण २५ गुन्हे उघडकीस आणुन १० लाखाचे दागिणे हस्तगत केले)

पनवेल, दि. 07 (वार्ताहर)  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जेष्ठ नागरीकांना एकटे गाठुन पुढे अपघात झाला आहे. चोरी झाली आहे. दंगल चालु आहे अशी खोटी माहिती देवून हातचलाकी करून पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम फसवणूक करणारे दोन गुन्हेगारांना व अशी चोरीची मालमत्ता विकत घेणा-या ज्वेलर्सला गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल यांनी अटक करून अशा प्रकारचे एकुण २५ गुन्हे उघडकीस आणुन २००.५० ग्रॅम सोन्याचे दागिण्यांसह १०,२५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मागील दोन वर्षांत जेष्ठ नागरीकांना बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम फसवणूक केल्याबाबतचे काही गुन्हे नवी मुंबई आयुक्तालयात दाखल झाले होते. जेष्ठ नागरीकांमध्ये पोलीसा विषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सदरचे गुन्हे उघडकीस आणन्याबाबत मा पोलीस आयुक्त श्री बिपीनकुमार सिंह, मा.सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री सुरेश मेंगडे यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळया टिम तयार करण्यात आल्या होत्या.

गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्हयांतील घटनास्थळ, जेष्ठ नागरीकांना केलेली बतावणी, परीसरातील सीसीटिव्ही कॅमेरे व गोपनिय बातमीदार यांच्या मार्फत गुन्हे शाखा कक्ष २ चे अधिकारी व अमलदार तपासकरीत असताना पोलीस उप निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळालेल्या बातमी अन्वये खालील दोन आरोपी व गुन्हयातील चोरीचा माल विकत घेणा-या ज्वेलर्स यांना अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीचे नाव –

१) युसुफ सलीम सैय्यद, वय २४ वर्षे, रा. गुलशन चाळ, वैष्णव माता मंदिराचे मागे, बनेली, टिटवाला पुर्व, ता. कल्याण

२) गणेश प्रभाकर शिंदे, वय ४० वर्षे (रिक्षाचालक) रा. साईकृष्णा चाळ, रूम नंबर १, पाण्याचे टाकी जवळ, मोहिली गाव, ता. कल्याण ३) सुरज मंजुनाथ रेवणकर, वय ३० वर्षे, व्य. ज्वेलर्स, रा. विमलेश्वर निवास, बॅरेक नंबर ६६९, तेज बहादुर कॉलनी, उल्हासनगर नंबर ३, जि. ठाणे नमुद अटक आरोपी हे त्यांचा एक साथीदार गुन्हयातील पाहिजे आरोपी याच्यासह सदरचा गुन्हा करत असल्याबाबत त्यांनी कबुली दिली आहे. सदरचा गुन्हा हे नमुद आरोपी शहरातील बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, वॉकिंग ट्रॅक, गार्डन या परीसरात जेष्ठ नागरीकांना एकटे गाठुन त्यांना पुढे अपघात झाला आहे, चोरी झाली आहे, दंगल चालु आहे अशी खोटी माहिती देवून पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हे त्यांच्या जवळ असलेल्या एखादया रूमालामध्ये अथवा कागदामध्ये गुंडाळुन हातचलाखी करून सदरचे दागिणे लंपास करीत असत. नमुद आरोपींनी फसवणूक केलेले सोन्याचे दागिण्यांपैकी काही दागिणे ज्वेलर्स सुरज मंजुनाथ रेवणकर यास विकी केले आहेत. सदरचे दागिणे हे गुन्हयातील असल्याचे माहित असूनही ते विकत घेतल्याबाबत नमुद ज्वेलर्स नामे सुरज रेवणकर यास सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.

नमुद अटक आरोपी कडुन गुन्हे शाखा कक्ष २ यांनी अंदाजे १०,२५,०००/- रूपये किंमतीचे एकुण २००.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले असून एकुण २५ बतावणीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची उत्कृष्ट कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे, सपोनि. संदिप गायकवाड, सपोनि. प्रविण फडतरे, पोउपनि. वैभवकुमार रोंगे, पोउपनि. मानसिंग पाटील, सफौ/ सुदाम पाटील, पोहवा/१०३४ ज्ञानेश्वर वाघ, पोहवा / १३४३ मधुकर गडगे, पोहवा / ४२० सचिन पवार, पोहवा / १७३२ अनिल पाटील, पोहवा / ४४ तुकाराम सुर्यवंशी, पोहवा / १३३९ प्रशांत काटकर, पोहवा/१९३ रणजित पाटील, चापोहवा / १९३० राजेश बैकर, पोना/ १७९९ निलेश पाटील, पोना / २०२२ रूपेश पाटील, पोना/ २०८२ इंद्रजित कानु, पोना/२००५ सचिन म्हात्रे, पोना/१७३८ दिपक डोंगरे, पोना / ४४१३ आजिनाथ फुंदे, पोना/ २३३४ प्रफुल्ल मोरे, पोना / २२५६ राहुल पवार, पोशि/१२५९३ संजय पाटील, पोशि/ ३५७७ प्रविण भोपी, पोशि/४३१७ विकांत माळी यांनी केली आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.