खोपोली शहरातील काशी होम तर्फे दहीहंडी उत्सव…

प्रतिनिधी/(साबीर शेख)

खोपोली शहरातील नावाजलेल्या काशीहोम प्रायव्हेट लिमिटेड तर्फे यंदाचा सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.

प्रथम पारितोषिक क्रमांक एक लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस सात सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षीस यंदाच्या वर्षी होणारा गोविंदा उत्सव शासनाने दिलेली अनुमती पाहता गोविंदा पथकांचा उत्सव उत्साह वाढविणारा आहे.

खोपोली शहरात यंदाचा गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी आयोजकांकडून भव्य दिव्य स्वरूपात तयारी चालू आहे.तसेच खोपोली शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते या आयोजनात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळणार आहेत.

खोपोली शहरातील लोकप्रिय बांधकाम व्यावसायिक काशी होम्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे खोपोली शहरात शास्त्रीनगर येथे गुरुद्वारासमोर भव्य दहीहंडी चे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी कार्यक्रमासाठी गोविंदा पथकांचे स्वागत करण्यासाठी आयोजकांनी उत्कर्ष इव्हेंट्स आयोजित ऑर्केस्ट्रा व ढोल पथक सज्ज ठेवले आहे.

प्रथम सात सलामीला आकर्षक बक्षिसांसाठी विशेष मानधन आहे कोविड काळानंतर होणाऱ्या दहीहंडी उत्सवात जिल्ह्यातून नव्हे तर मुंबई पुणे येथून गोविंदा पथके काशी होम्स या दहीहंडी उत्साहात हजेरी लावत असतात या निमित्ताने शास्त्रीनगर येथे तरुणात उत्साहाचे वातावरण आहे.

अधिक माहितीसाठी सूर्यकांत देशमुख चंद्र आणि वार ईश्वर शिंपी, सुहास वझरकर ,आरसला अबू जळगावकर, संतोष मालकर, प्रशांत कोठावले यांच्याशी संपर्क करण्याचे आयोजकांनी कळविले आहे.
9850944448
8805633001
7798698503

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.