पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग 14 येथे दावत -ए -इफ्तार .
पनवेल दि.२२ (वार्ताहर) : पनवेल शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ प्रेस्टिज गार्डन सोसायटी, येथे दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर-कच्छी, प्रभाग क्रमांक १४ चे उपविभाग संघटक जुनैद पवार, शाखाप्रमुख नुरूल्ला वाईकर ,यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास पाहुणे म्हणून मौलाना शाह अब्दुल गणी व शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगर संघटक अॅड. प्रथमेश सोमण, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, जमील खान, इम्तियाज शेख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.