विमानतळ नामकरण आंदोलन आता अधिक तीव्र करणार  – प्रशांत ठाकूर

रिपाई नेते रामदास आठवले व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा माझ्या डोक्यावर हात आहे व दी.बा पाटील यांच्या आशीर्वादाची मला साथ आहे नामकरण मागणी साठी 24 जून ला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार…जगदीश गायकवाड

जगदिशभाई गायकवाड यांच्यावर हेतुपुरस्सर केलेली तडीपारीची कारवाई अखेर न्यायालयात टिकू शकली नाही. त्यांच्यावरील तडीपारीची कारवाई रद्द करण्यात आल्याने त्यानिमित्त त्यांचे  स्वागत अभिनंदन करण्यासाठी आणि अन्यायकारक कारवाई रद्द झाल्याचा जल्लोष करण्यासाठी रॅली त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिताई मंगल
निवास,आंबेडकर नगर, रोडपाली नगरसेविका विद्या ताई गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काढली होती

दि.बा पाटील यांच्या आशीर्वादाची मला साथ आहे नामकरण मागणी साठी 24 जून ला परत मोठ्या संख्येने भेठू

दिवंगत नेते दी बा पाटील यांच्या संग्राम ह्या निवासस्थानी जाऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जगदीश गायकवाड यांनी आशीर्वाद घेतला.
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कृती समिती शिष्टमंडळ, रायगड जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती .

लोकांच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तडीपार व्हावं लागलं तरी मागे हटणार नाही .
माझं सर्व जीवन माझ्या वर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सेवे साठी समर्पित केले आहे. संविधानिक न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन मोर्चा करून जनसामान्यांचा आवाज अधिकार हक्क मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहू.

24 जून ला होणारे आंदोलन मोठ्या ताकतीने नवी मुंबई एअरपोर्टला।  दी. बा .पाटील यांचं नाव असावं या मागणीसाठी कृती समितीच आंदोलन संघर्ष तीव्र करून, पुढची लढाई नामकरण होई पर्यंत नियोजित करत राहू .
लोकहित करण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत नामकरणासाठी संघर्ष चालू राहणार .

सहकार्य करण्यासाठी माझ्या प्रत्येक संघर्षात ज्या ज्या हितचिंतकांनी,कार्यकर्त्यांनी , नेत्यांनी पक्ष संघटनांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी सदैव ऋणी राहील असे भावूक होऊन जगदीश भाई यांनी उपस्थिती सर्वांचे आभार मानले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.