“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये नवी मुंबई शहरास 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (1st Rank as India’s Cleanest Big City) बहुमान प्राप्त झाला आहे.

 

त्याचप्रमाणे ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबई देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे. तसेच ‘कचरामुक्त शहर’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका ‘फाईव्ह स्टार’ मानांकित शहर ठरले आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास ‘वॉटर प्लस’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. अशी मानांकने प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.

 

*शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे चार राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक तसेच शहर स्वच्छतेसाठी अथक मेहनत करणारे स्वच्छताकर्मी यांना समर्पित केले आहेत. या सन्मानामध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी, विशेषत्वाने स्वच्छताकर्मी सफाई कामगार आणि स्वच्छतेविषयी जागरूक लोकप्रतिनिधी, विविध संस्था-मंडळे तसेच विविध वयोगटातील नागरिक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा सर्वच घटकांनी आपले अनमोल योगदान दिलेले आहे त्याबद्दल सर्वांचे आभार व अभिनंदन करीत स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आता ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हाच आपला ध्यास कायम राखण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांनी मिळून अधिक जोमाने काम करूया असे आवाहन केले आहे.*

 

*महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उपस्थित रहात अधिकारी, कर्मचारीवृंदाचे अभिनंदन केले व पुढील काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. याप्रसंगी पुरस्काराची मानचिन्हे. प्रमाणपत्रे यांच्यासह आयुक्त श्री. अभिजीत बांगर तसेच स्वच्छताकर्मी, कर्मचारी, अधिकारी यांचेसमवेत* अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, श्री. जयदीप पवार, डॉ. श्रीराम पवार, श्रीम. संध्या अंबादे, श्री. अशोक मढवी, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे यांच्या उपस्थितीत समुह छायाचित्र काढण्यात आले.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.