कर्जतमधील बेकायदेशीर अनधिकृत जुगाराचा अड्डा (क्लब )
वार्ताहर जयेश जाधव
*कर्जतमधील बेकायदेशीर अनधिकृत जुगाराचा अड्डा (क्लब ) पोलिस अधीक्षक अशोक दुधे साहेब लक्ष देतील का???*
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर कर्जत -चौक या राज्यामार्गावरील कर्जत चार फाटा रस्त्यावरील सिताई हाॅटेलच्या समोरील रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रुममध्ये (खोलीत )बेकायदेशीर अनधिकृत जुगाराचा अड्डा क्लब दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहे.या जुगाराच्या क्लबवर कर्जत बाहेरील सराईत गुन्हेगारी क्षेत्रातील इसम पत्याचा जुगार खेळायला येत असतात.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुर्यवंशी व कर्जतचे डीवाय एसपी विजय लगारे यांचा अवैध धंद्यांना जबरदस्त वरदहस्त या जुगार माफियांना असल्याचे समजते कर्जत डीवाय एसपी कार्यालयातील मोरे नामक पोलिस यांनी अर्थपुर्ण व्यवहार केला असून क्लबला वरदहस्त दिला आहे तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून जुगाराचा अड्डा कायमस्वरूपी बंद करणेकामी पोलिस अधीक्षक रायगड व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टिमला या अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचा अड्ड्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.