कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याची मागणी… आझाद कामगार संघटन अध्यक्ष महादेव वाघमारे
पनवेल प्रतिनिधी /प्रेरणा गावंड
पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत सफाई, घंटागाडी, धुरफवारणी कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या बोनस देण्याची मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी म्हटले आहे की, सफाई (1500), घंटागाडी (400), धूर फवारणी (100) असे जवळ जवळ 2000 कंत्राटी कामगार ठेकेदार साई गणेश इंटरप्रायजेसमार्फत काम करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांना बोनस दिला जातो. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यास कामगारांना अडचणी निर्माण होतात. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीचा पगाराच्या 8.33 टक्के बोनसची रक्कम महापालिकाने ठेकेदार साई गणेश इंटरप्रायजेसला प्रत्येक महिन्याच्या बिलात दिलेली आहे. तरी आपण दिवाळीच्या कामगारांना बोनस देण्याच्या लेखी सूचना सदर ठेकेदाराला द्याव्यात, ही मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली आहे.