कोपरागाव एकविरा आईच्या पालखीला दर्शन घेण्यासाठी भक्तांची ओढ !

विरोधी पक्ष नेत्या सहित स्थायी समितीसभापतींनी घेतले दर्शन

पनवेल : करोनाच्या निरबंधांमुळे भाविकांच्या उत्साहावर निर्जन पडत होता महाराष्ट्रातून नव्हे तर परदेशातून आई एकविरेचे असंख्य भक्तजन आहे .करोनाच्या निरबंध काही प्रमाणात कमी होत असल्याने एकविरा आई च्या भक्तांना आईला भेटण्याची ओढ लागली आहे पनवेल तालुक्यातील कोपरगाव वेसुदेवी युवा मित्र मंडळ व हनुमान ग्राम विकास मंडळ कोपरागाव (खारघर) ते श्री क्षेत्र (कार्ला) एकविरा आई देवी पालखी पदयात्रा सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी पनवेल उरण सह अन्य भागातून भक्त जण उपस्थित होते यंदा पालखी चे नऊ वे वर्ष असून पालखी थाटामाटात गावातून नेण्यात आली पनवेल तालुक्यातून मानाची पालखी म्हणून कोपरा गावची एकविरा आईची ही पालखी ओळखली जाते.करोना संकट दूर होण्यासाठी भक्तां सहित वेसूदेवी युवा मित्र मंडळ अध्यक्ष रोहित रतन कोळी यांनी आई एकविरा चरणी साकडे घातले आहेत .

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी पालखीचे आवर्जून दर्शन घेऊन पालखीला खांदा दिला सोबत पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती कोपरा गावचे रहिवासी नगरसेवक ॲड.नरेश ठाकूर व संतोष तांबोळी हे ही प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत पालखीला खांदा देण्यास उपस्थित होते. मागील वर्षी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध असल्याने पालखी एक दिवसात पाच ते सहा जणांमध्ये नेण्यात आली म्हणून एकविरा आईच्या भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती
यंदा प्रादुर्भाव कमी असल्याने पुन्हा त्याच जल्लोषात थाटामाटात पालखी उत्सव सोहळा करण्यात आला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.