कामोठे कॉलनी फोरम तर्फे शिवजयंतीनिमीत्त शिवचरित्राचे वाटप


प्रतिनिधी:-
शिवजयंती निमित्त कामोठे कॅालनी फोरमा च्या वतीने ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिवचरित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. एम्पोवर आयोजित शिवजम्नोत्सव सोहळ्यात कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने शिवचरित्राचे वाटप करुन अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुण्या म्हणून नगरसेविका लीनाताई गरड ह्या उपस्थित होत्या. कामोठे सेक्टर १६ येथील गोकुळ डेअरी येथील चौकात ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या तरुण पिढीपर्यंत योग्य वयात शिवचरित्र पोहोचावे आणि त्यांना आपल्या आराध्य दैवताबद्दल; छत्रपती शिवरायांबद्दल् माहिती व्हावी ह्या प्रामाणिक ऊद्देशाने कामोठे शहरातील १५० विद्यार्थ्यांना शिवचरित्राचे वाटप करुन कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहण्यात आली.
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, रंजना सडोलीकर, राहुल बुधे, बापू साळुंखे, राहुल आग्रे, डॉ. सखाराम गारळे, अरुण जाधव, ॲड. समाधान काशीद, निलेश आहेर, महेंद्र जाधव, संदिप ईथापे, सुनिल कर्पे, भरत उतेकर, अरूणा सावंत,शुभांगी खरात, निवेदिता बारपत्रे ह्यांच्यासह कामोठे कॉलोनी फोरमच्या सर्व समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.