पाली खुर्द ग्रामस्थांना ४००० ते ५००० लिटर क्षमेतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे (जलकृंभ) उद्दघाटण जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते
प्रतिनिधी:- शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशनच्या वतीने तसेच ग्रामपंचायत सदस्य पाली खुर्द चे चिंतामणी सुरेश शेळके, अरुण कोंडीराम जळे, सौ. सुषमा नितिन कडव, यांच्या प्रयत्नाने पाली खुर्द ग्रामस्थांना ४००० ते ५००० लिटर क्षमेतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे (जलकृंभ) उद्दघाटण जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या जलकृंभामुळे पाली खुर्द च्या महिलांना पाण्याचे हंडे खाली उतरविण्याचे काम जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. इथून पुढे पाली खुर्द च्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची गरज भासणार नाही. पाली खुर्द च्या ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेबांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
तसेच याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नाने पाली खुर्द भाजपचे शेकडो पुरुष व महिला कार्याकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
या वेळी तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, उपतालुका प्रमुख नरेश पाटील, कलंबोली शहर प्रमुख डि.एन. मिश्रा, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ललित बुंदेला, मनोहर शेळके, माजी सदस्य हरिश्चंद्र कडव, रोशन कडव, अनंता पाटील, अरुण पाटील, रवी भोपी, नितिन कडव आदि पदाधिकारी व पाली खुर्दचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते