खारघरवासियांच्या खास आग्रहास्तव भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजता खारघरमध्ये ‘सुश्राव्य गाण्याची सुरेल मैफल अर्थात दिवाळी पहाट २०२१’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          खारघर सेक्टर १२ मधील ग्रीन फिंगर शाळेजवळील गावदेवी मैदानात हि सुरेल मैफिल होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने करण्यात आले आहे.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.