महाड चवदार तळ्यावर  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी पाण्याचा सत्याग्रह करत “‘ न भूतो न भविष्य “‘ अशी अभूतपूर्व महान क्रांती केली होती त्याला आज ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

दिनांक २० मार्च रोजी चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू गुरू पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो (विपशचार्यां) व राजकीय ,सामाजिक, इतर  अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाड शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.
तसेच ऐतिहासिक क्रंतिस्तंभ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.

YouTube player

यावेळी प्रकाश आंबेडकर , आठवले ,कवाडे ,गायकवाड  अश्या अनेक  अनुयायी म्हणून राजकीय  नेतृत्व करणाऱ्या शेकडो परीवारांनी  देखील उपस्थिती दाखवली ,
क्रंतिस्तंभ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन केले. यावेळी  जिल्हा युवक नरेंद्र गायकवाड , विद्या ताई गायकवाड,धम्मसेवक नागसेन कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष शरद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे पदाधिकारी शिरिष चिखलकर, शशिकांत बर्वे, श्रीधर जाधव, राहुल कांबळे, गोविंद खडमलकर, विनायक कांबळे इत्यादी मान्यवर भिखु, आंबेडकर अनुयायींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद केले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.