अनेकांना  जीवनदान देणारे  ….

पनवेल चे वैद्यकीय क्षेत्रातील गोरगरीब आणि विश्वासु  डॉ.गिरीश गुणे व डॉ.सौ.संजीवनी गुणे वैयक्तीक फि आकारणार नाहीत.

गोरगरीबांचे डॉक्टर आणि दैवत म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ.गोविंद गुणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सुपूत्र डॉ.गिरीश गुणे आणि डॉ.सौ.संजीवनी गुणे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ एक आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार डॉक्टरांची रुग्ण तपासणी फी देण्याची ऐपत नसणार्‍या गोरगरीब रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
शहरात असलेल्या गुणे हॉस्पिटल येथे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉ.गिरीश गुणे आणि डॉ.सौ.संजीवनी गुणे या रुग्ण तपासणी फि आकारणार नाहीत. तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देतील. सदरहू रुग्णांनी शनिवारच्या तपासणीसाठी पुर्व नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी फोन नं.022-27453033, 022-27453992, 09920763089 व 09869793224 येथे साधायचा आहे. या निशुल्क तपासणीतून पुढील उपचारासाठी गरज भासल्यास रुग्णांना (उदा. रुग्णालयातील अ‍ॅडमिशन किंवा शस्त्रक्रिया) डॉ.गिरीश गुणे व डॉ.सौ.संजीवनी गुणे वैयक्तीक फि आकारणार नाहीत. इतर सर्व खर्च (उदा.औषधे, शस्त्रक्रिया, साहित्य, भुलतज्ञांची फी, रक्त व इतर आवश्यक तपासण्या) रुग्णास करावयाच्या आहेत. या सुविधेचा लाभ सर्वसाधारण कक्षातील दाखल रुग्णांसाठी असेल व त्याची सुरूवात आजच्या शनिवारपासून करत असल्याची माहिती डॉ.गिरीश गुणे यांनी दिली.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.