आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये प्रवेशासाठी सहज मार्गदर्शन शिबिर संपन्न…
श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. शेखर जांभळे यांनी आयोजीत केला उपक्रम…

प्रतिनिधी खोपोली…

सहज सेवा फाउंडेशन विवीध क्षेत्रात सातत्यपूर्ण सामाजीक कार्य करीत असते.शिक्षण क्षेत्रातील वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षण मिळावे या हेतूने वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणारी सहज निसर्ग शाळा ही समाजास आदर्श देणारी ठरत आहे.शिक्षण क्षेत्रातील सामाजीक भावनेतून नवीन उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या मातोश्री श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सैन्यात जाण्याची इच्छा बऱ्याच विद्यार्थ्यांची असते, परंतु योग्य माहिती नसल्याने ही इच्छा प्रत्यक्षात उतरत नाही. यासाठी 10 वी पासूनच तयारी केल्याने तिन्ही दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अचूक व अनुभवी मार्गदर्शन दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झाले. सैन्यातील 28 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कमांडर सचिन पवार यांनी विद्यार्थी व पालकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडताना कोणती शाखा व विषय निवडावेत हे समजावून सांगितले यावेळी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.

या उपक्रमास खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार,खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते,व्ही.डी.एम.स्कूलच्या संचालिका तेजस्वी देशमुख, उद्योजक दिवेश राठोड,सुजीत पडवळकर, पल्लवी पडवळकर,शिशु मंदिरच्या शिक्षिका आशा देशमुख,ॲड.मुनिदास गायकवाड,प्रवीण जाधव,ईश्वर कासार व मार्गदर्शन ऐकण्यासाठी 100 पेक्षा ज्यास्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार व खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी विद्यार्थी व पालकांना भविष्यातील करिअर निवडताना काय करावयास हवे यासाठी भूमिका विषद केली.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, उपाध्यक्षा ईशिका शेलार,सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी.निरंजन,संघटक अखिलेश पाटील,जनसंपर्क प्रमूख जयश्री कुलकर्णी,मार्गदर्शक मोहन केदार,बंटी कांबळे,अजय कांबळे,सोनाली गाढवे,जयश्री भागेकर यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले.

कर्जत खालापुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये प्रवेशासाठी शाळांमधून सहज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा सहज सेवा फाउंडेशनचा मानस आहे.
पार पडलेल्या उपक्रमातून विद्यार्थी व पालकांनी अश्या प्रकारच्या उपक्रमाची आवश्यकता आहे असे सांगून सातत्यपूर्ण या उपक्रमाचे आयोजन करावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.