प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ ईद मिलाद उन नबी उत्सव जगभरात साजरा

खोपोली प्रतिनिधी/प्रेरणा गावंड

ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी  प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ खोपोली शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील अनेक मुस्लिम संस्था ,समुदाय ह्यात सामाजिक सलोखा जपत विविध कार्यक्रम करतात.
शीळ पटेलनगर ,सहकार नगर ,बाजारपेठ, अश्या अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून धार्मिक वाचन,पठण करत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक सामाजिक, राजकीय ,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच सहभाग असतो.


मुस्लिम बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’ शुभेच्छा देत जगातील संपूर्ण मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती, अर्थात ईद-ए-मिलाद हा सण साजरा करतात. त्यांचे विचार सर्व भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. समस्त मानव जात एक आहे अशी शिकवण ते देतात. त्यांनी मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत समाज निर्मितीचे अश्या उत्सवाचे हे पर्व आज खोपोली शहरात अनुभवले .

खोपोली पोलिस प्रशासनाने यावेळी सुरक्षित दृष्टिकोनातून योग्य नियोजन केले होते

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.