खोपोली शहरात एकता दौड उत्साहात संपन्न

खोपोली:( प्रतिनिधी ) दिनकर भुजबळ
मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली नगरपरिषद व खोपोली पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंतीनिमीत्त “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ व एकता दौड ( Unity Run) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना जे. डी. धायगुडे मॅडम यांनी एकात्मतेची शपथ दिली.तर निशिकांत सुर्वे यांनी दौड संबंधित मार्गदर्शन केले. खोपोली नगरपरिषद कार्यालय (नवीन प्रशासकीय इमारत) येथून वाहतुकीचे नियम पाळत दौडला सुरूत करण्यात आली.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे,डॉ. सुनिल पाटील, पोलीस गोपनीय विभागाचे कादीर तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ,डॉ. संगीता वानखेडे , गौतम भंगळे उप मुख्याधिकारी, प्रहार आकाडामीचे विद्यार्थी, विद्यार्थीनी , पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने मान्यवर नागरीक उपस्थित होते.ही दौड नगरपरिषद ऑफीस पासून सुरू होऊन गिरनार कॉर्नर, विणानगर, काटरंग, मोगलवा डी, वरची खोपोली कमान येथून दीपक हॉटेल चौक मार्गे, नगरपरिषद ऑफीस जुनी इमारत समोरून जनता विद्यालय ग्राउंड वरती पोहचली व तेथे समारोप करण्यात आला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.