एमपॉवर महिला दिन धुमधडाक्यात, उद्योग जत्रा आणि खाद्य जत्रेला फुल्ल ऑन गर्दी, कॅन्सर निदान शिबिर आणि रक्त तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद
पनवेल दि,११ (वार्ताहर):
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योग आणि खाद्य जत्रेमध्ये लागलेल्या 32  स्टॉलला उदंड प्रतिसाद लाभला. अपेक्षेपेक्षा दुप्पट विक्री झाल्याचे समाधान स्टॉलधारकांनी व्यक्त केले. ब्रॅण्डिंग आपल्या व्यवसायाची आणि बॉण्डींग आपल्या समाजाशी अशी “ब्रॅण्डिंग आणि बॉण्डिंग” ही महिला दिनाची एम पॉवर ने निश्चित केलेली थीम यशस्वी होताना दिसून आली. दोन दिवस चाललेल्या उद्योग जत्रेची दिनांक 9 मार्च बुधवारी रात्री १० वाजता सांगता करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष भाजयुमो विक्रांत पाटील, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सदस्य गणेश कडू, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विनोद साबळे, भाजयुमो कामोठेचे  हर्षवर्धन पाटील, ग्लिस्टरचे सचिन गावंड यांच्या हस्ते व लीना गरड नगरसेविका, नीलम आंधळे दिशा फाउंडेशन, राजश्री कदम पनवेल राष्ट्रवादी महिला सेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून आणि फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
       महिलांमधील कॅन्सर या विषयावर डॉ प्रांजली अंधारे, डॉ स्वाती गरड, डॉ कांचन पाटील वडगावकर, डॉ आशा डोंगरे, डॉ अनुजा शेलार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी जीवन ज्योत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ वैभव अंधारे, तसेच उलवे, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बाल रोग तज्ञ डॉ अमरदिप गरड यांनी संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून दिली. बाय हार्ट पॅथ लॅब करंजाडे DRx.  तानाजी ढेरे व त्यांच्या टीमने मोफत रक्त तपासणी  शिबिराच्या माध्यमातून पाच प्रकारच्या टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या. या शिबीरास महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
       ग्लिस्टर,रिद्धी-सिद्धी लॉजिस्टिक, पंढरीनाथ चाय, यांच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रायोजक म्हणून ग्लिस्टर एलईडी लाइट्स ,अश्र्विता फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, रिद्धी सिद्धी लॉजिस्टिक, बेलोटे चिकन, भक्ती सुगंध सुवासिक अगरबत्ती व पूजा साहित्य  मैत्रीण बुटीक,V.S. ट्रेडर्स मेन्स अँड किड्स वेअर आणि डोकेज फ्रोजन फूड स्टुडिओ इत्यादी प्रायोजक लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिलांच्या टीमने कष्ट घेतले, आणि एमपॉवर टीमच्या पुरुष बांधवांनी सपोर्ट सिस्टिमची भूमिका निभावली.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.