भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 @ पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी संगीत, नृत्य आणि नाटकांची यानिमित्ताने मेजवानी असणार आहे.
या मनोरंजनात्मक कार्यक्रमात रत्नागिरी येथील कलांश थिएटर्स प्रस्तुत ‘बारस’ हे धम्माल विनोदी नाटक, स्टार प्लस वृत्तवाहिनीवरील डान्स प्लस फेम पनवेलकर ग्रुप आणि नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुप आदई यांचे नृत्य, तर सामगंध पनवेल यांची सुरेल मैफल रंगणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करून होणार्या या कार्यक्रमासाठी प्रवेश निशुल्क असून प्रवेशिका अनिवार्य व मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.