२५०० पैकी २.७ टक्के विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष

टायटन आय प्लसतर्फे डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता अभियान..

ठाण्यातील शालेय मुलांची डोळे तपासणी केली

ठाणे दि, ७ (प्रतिनिधी) :

टायटन आय प्लस या भारतातील सर्वात मोठ्या आयकेअर ब्रँडने महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये ११ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची डोळे तपासणी केली. अतिशय तपशीलवार, कोणतीही चूक न होता केल्या जाणाऱ्या, २० टप्प्यांच्या नेत्रतपासणी प्रक्रियेमार्फत टायटन आय प्लसने जवळपास २५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डोळ्यांची नीट देखभाल करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यात मदत केली आहे.
टायटन आय प्लस च्या प्रशिक्षित ऑप्टोमेट्रीस्ट्सनी डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २५०० हुन जास्त विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासण्या केल्या. यापैकी ८.६% विद्यार्थ्यांना दृष्टीमध्ये सुधारणा करून घेण्याची गरज असल्याचे तर जवळपास २.७% विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या आजारांची लक्षणे असल्याचे आढळून आले. या विद्यार्थ्यांनी नेत्रचिकित्सकांचे मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला त्यांना देण्यात आला.

एका अनुमानानुसार, संपूर्ण देशभरात ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना दृष्टीमध्ये सुधारणा करवून घेण्याची गरज आहे पण त्यावर उपाययोजना करवून घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अवघे एक तृतीयांश आहे. टायटन आय+ हा ब्रँड आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून आणि नवनवीन उपाययोजनांमधून डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व भारतीयांनी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दर्जेदार मानक प्रथांचे पालन करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असतो.


व्हर्च्युअल शिक्षणामुळे, तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुले आपला बराच वेळ वेगवेगळ्या स्क्रीन्सवर व्यतीत करतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्याकडे तत्परतेने आणि जाणीवपूर्वक लक्ष देणे खूप गरजेचे आहे. मोबाईल फोनवर अगदी सहजपणे डोळे तपासता येतील अशी १० सेकंदांची लाल व हिरवी अभिनव व सुविधाजनक नेत्र तपासणी टायटन आय+ ने नुकतीच सुरु केली. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
यावेळी टायटन कंपनी लिमिटेडचे आयकेअर डिव्हिजनचे मार्केटिंग हेड श्री. मनीष कृष्णमूर्ती यांनी सांगितले, “डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करवून देणे हे आमचे मिशन आहे असे आम्ही टायटन आय+मध्ये मानतो. जीवनशैलीमध्ये झालेले बदल आणि नियमितपणे डोळे तपासणी करवून न घेण्याने लहान वयातच मुलांची दृष्टी अधू होण्याचा धोका असतो, ज्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील होऊ शकतो. ग्राहकांना माहिती पुरवून, जागरूक करण्याच्या आमच्या मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आणि आम्हाला आनंद आहे की, यासाठी आम्ही शाळांना सहकार्य प्रदान करू शकलो.”
टायटन आय+ने ठाण्याच्या शाळेमध्ये आयोजित केलेला नेत्र तपासणी उपक्रम हा लहान वयापासूनच डोळ्यांची प्रतिबंधात्मक देखभाल करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या आरोग्याशी निगडित विविध समस्या आणि मुलांच्या निरोगी, सुदृढ भविष्यासाठी डोळ्यांच्या देखभालीच्या सुयोग्य प्रथांची माहिती देखील यामधून दिली गेली.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.