आम आदमी पार्टी कोकण प्रांत संघटीका वैशाली कोळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी केला पक्ष प्रवेश

नवीन पनवेल : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आल्याचे दिसत असून नवीन पनवेल बांठीया विद्यालयाच्या हॉलमध्ये आम आदमी पार्टीचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. महापुरुषांना वंदन करून या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी सुरवात झाली.

महाराष्ट्र संघटक विजय कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मांध्यान आणि कोकणप्रांत संघटक विलास घरत यांच्या प्रमुख उपस्थित पनवेल- उरण तालुक्यातील १० ते १२ गावच्या शेकडो महिला पुरुषांनी पक्षप्रवेश केला.
             यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र संघटक विजय कुंभार व महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मांध्यान, विलास घरत व आयोजक कोकण प्रांत महिला संघटिका वैशाली संतोष कोळी यांनी प्रस्तावना करून मार्गदर्शन केले. व पक्षप्रवेश करून घेतला. राहुल कासारे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित आम आदमीचे हरिचंद्र वाघमारे, भोसले सर आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यता आदिवासी समाज बांधव पनवेल-उरण येथील मोठी जुई, धाकटी जुई, विंधने, चिरनेर, टाकी गाव, चिरनेर येथील 7 आदिवासी वाड्यातील नागरिकानी प्रवेश केला. यात विद्यानंद घरत व प्रल्हाद पाटील, प्रमोद भगत, नरेश घरत यांनी विशेषतः मेहनत घेतली असून त्याच्याबरोबर नेहा कातकरी, विद्या कातकरी, लता कातकरी, राजू कातकरी, भुरी कातकरी, गुलाब कातकरी, लक्ष्मी कातकरी, हरीबाई जोशी, अंकिता ठाकूर, रिंकू दास, लता गायकवाड, चंद्राबाई कोळी, कृष्णाबाई कोळी, नथुरा कोळी, आदी सह शेकडो महिला पुरुषांनी प्रवेश केला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.