नागरिकांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे : महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांचे आवाहन
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैद्यकिय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी केले आहे. याआधी कोविडमुळे ऑनलाईन पध्दतीने महापौर निधीसाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने होते. परंतू आता ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.
महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी (कोविड19, हृदयरोग, मेंदू संबधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबधित शस्त्रक्रिया, ल्युकेमीया, थॅलेसीमीया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो ) आर्थिक मदत करण्यात येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अंपगत्व आलेल्यानां आर्थिक मदत करण्यात येईल.
या महापौर निधीचा लाभ घेण्याकरिता महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील (वेबसाईटवरील) अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. हा अर्ज आणि त्यासोबत लागणारी कागदपत्रे महापालिकेला panvelcorporation@gmail.com या ईमेलवरती पाठवावी किंवा महापौर कार्यालयामध्ये जमा करावी.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी पालिकेच्या समितीद्वारे केली जाईल. त्यानंतर पात्र गरजूंना पुढीलप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येईल.
अंदाजित खर्च अर्थसहाय्य
1. लाख रू. 5,000/-
1 लाख ते 2 लाख रू.10,000/-
2 लाख ते 3 लाख रू.15.000/-
3 लाख ते 4 लाख रू.20.000/-
4 लाखाच्यावर रू.25.000/-
महापौर सहाय्यता निधी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
1. वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक/ प्रमाणपत्र डॉक्टारांच्या सही व शिक्क्यासह( खाजगी रूग्णालय असल्यास वैद्यकिय आरोग्य् अधिकारी यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
2. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
3. रूग्णाचे ओळखपत्र.(पमपा हद्दीतील आधारकार्ड, पॅन्कार्ड, मतदानाचे ओखळपत्र किंवा पासपोर्ट यापैकी एक)
4. रूग्णाचे रेशनकार्ड.
5. संबधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्य आहे.
6. नगरसेवक शिफारस पत्र.