भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रतिनिधि/( प्रेरणा गावंड )
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे,सहाय्यक संचालक रचनाकार ज्योती कवाडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, माजी नगरसेवक व नगरसेविका,कार्यकारी अभियंता संजय कटेकर, पालिका अधिकारी, सर्व विभाग प्रमुख,उपस्थित होते.
यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली.शिक्षण विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून गेले दोन दिवसापासून पालिका क्षेत्रात घरोघर तिरंगाफ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने सव्वालाख झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे.
दरम्यान 17 ऑगस्टला 11 वाजता स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. याच्या जनजागृतीसाठीपनवेल महानगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांची ही प्रभातफेरी काढण्यात आली.