कै.रमेश कचऱ्या काकडे यांची तृतीय पुण्यतिथी निमित्ताने अन्नदान सत्र धर्मकार्य

प्रतिनिधी खारघर( साबीर शेख)

कै.रमेश कचऱ्या काकडे यांची तृतीय पुण्यतिथी म्हणून त्यांचे कनिष्ट चिरंजीव राजेश रमेश काकडे यांच्या वतीने अन्नदान सत्र धर्मकार्य अनेक गरजूंना मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मदत करून आज खारघर येथे कै. रमेश काकडे यांची यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कै.रमेश कचऱ्या काकडे यांची तृतीय पुण्यतिथी निमित्ताने अन्नदान सत्र धर्मकार्य

कै. रमेश काकडे (अण्णा) खारघर शहरातील स्थानिक बेलपाडा गाव ग्रामस्थ काकडे कुटुंबातील प्रमुख मानाचे स्थान असलेले सर्वांचे अण्णा ,त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार व सहकुटुंब आजही कै. रमेश काकडे यांच्या समाजकार्य परंपरेला पुढे घेऊन जात आहे .कोणाच्याही सुखदुःखात उभे राहून आपल्या जगण्याचा अस्तित्व नेहमी ते आपल्या जनकार्यातून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवत असत .
राजेश काकडे यांनी आपल्या वडिलांची परंपरा कायम ठेवत समाजातील आपल्या कार्याला चालू ठेवून ते नेहमी समाजिक उपक्रम राबवत असतात .

कै.रमेश कचऱ्या काकडे यांची तृतीय पुण्यतिथी निमित्ताने अन्नदान धर्मकार्य

3 वर्ष पुण्यतिथी स्मरण करताना कनिष्ट चिरंजीव राजेश काकडे यांना अण्णांच्या आठवणीने मन भरून आले.
प्रेरणा नऊनिहाल चिल्ड्रन होम खारघर येथे त्यांनी अन्नदान सत्र म्हणून कार्यक्रम राबवला. कार्यक्रमाला उपस्थित कनिष्ठ चिरंजीव राजेश रमेश काकडे , मनोज दादा डोंगरे ,
कमलाकर पाटील, प्रदीप तांबडे, विनय म्हात्रे, राहुल तांडेल, रोशन पाटील, ऋतिक पाटील,शाहिद शेख व काकडे मित्रपरिवार उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.