सामाजिक सद्भावना ,भाईचारा, सलोखा जपत समता, बंधुता, एकता हा संदेश देत समाजसेवक उद्योजक ईम्तियाज शेख मित्र परिवार तर्फे अन्न सेवा …
प्रतिनिधी खारघर (प्रेरणा गावंड)
समाजसेवक उद्योजक ईम्तियाज शेख मित्र परिवार सदैव आपली जागरूकता आपलं कर्तव्य म्हणून लोकशाहीच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी, प्रशासकीय वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी उपयोजना करत असतात.
अहोरात्र मेहनत घेऊन समाजाच्या सुरक्षेसाठी सण ,उत्सवात ही कार्य करत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत ईम्तियाज शेख मित्रपरिवार प्रत्येक वर्षी आपले कर्तव्य म्हणून उत्तम आहार मेजवानी देत त्यांच्या आनंदात स्नेहभोजन करण्यासाठी आपल्या नियोजनातून प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अन्नसेवा देत आनंद उत्सव साजरा करण्याचा क्षण अनुभवत असतात.
अशा या अवलियास पनवेल ,नवी मुंबई कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आनंदाचे कारण बनण्याची एक निस्वार्थ इच्छा असते व ती इच्छा स्वइच्छेने जगण्यासाठी सण उत्सवात आपल्या परिवारांना सोडून समाजाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवाकरून जीवाची परवा न करता जगणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम शेख परिवार व सहकारी मिळून प्रत्येक वर्षी सामाजिक रित्या पारिवारिक संबंध जपत , समाजाचे कर्तव्य समजून दिमागदार पद्धतीने दर्जेदार पध्दतीने आयोजन करत असतात .
तसेच उत्तम आयोजन ह्या वर्षी ही आरटीओ विभाग, पोलीस प्रशासन तसेच सुरक्षा व आरोग्य अधिकारी यांच्या सेवेमध्ये सुद्धा गणेश उत्सवाच्या प्रसंगी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्नेहभोजन करून अन्न वाटप करून साजरा केला.
उत्तम आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सुरक्षा देणारे अधिकारी सक्षम, समृद्ध ,निरोगी ,स्वस्थ असल्यास त्यांना आपल्याच समाजाच्या परिवारातील सदस्य समजून त्यांच्या आरोग्याची आहाराची जबाबदारी स्वीकारणे मी आपले कर्तव्य समजतो, ही भावना लक्षात ठेवून उद्योजक इम्तियाज भाई शेख व त्यांच्या सहकारी प्रत्येक वर्षी आपल्या सहकारी, कर्मचाऱ्यांसोबत अन्नदान स्नेहभोजन कार्यक्रम पार पडतात
सामाजिक सलोखा जपत एकमेकांच्या कर्तव्याची जाण ठेवत आपण सर्वांनी मिळून समाजा च्या सेवेत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी वर्गास सन्मान देणे, काळजी करणे ,आपल्या सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे व ते कर्तव्य मी व माझे सहकारी निस्वार्थ पणे पार पाडत असल्याचे इम्तियाज शेख नेहमी मत मांडत असतात.
अशा अवलियाला प्रेम सन्मान आपुलकी म्हणून लेखणी च्या रुपी लाख लाख सलाम✍️