संस्कार भारती पनवेल समितीच्या माध्यमातून आणि पनवेल महापालिकेेचे नगरसेवक व भाजपचे शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या सौजन्याने लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेलमध्ये प्रथमच बालक – बाजारचे आयोजन करण्यात आले होते. या बालक बाजाराचे उद्घाटन वैशाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले असून या बाजराला नगरसेवक नितीन पाटील यांनी सदिच्छा भेट देत लहानग्यांना प्रोत्साहीत केले.
आपल्या पालकांबरोबर बाजारत जाणे हा लहान मुलांसाठी एक चांगला विरंगुळा असून, यातून त्यांना खरेदी विक्री, नफा-तोटा या गोष्टींचे ज्ञान मिळते. त्याअंतर्गत लहान मुलांना जीवनावश्यक व्यवहार ज्ञानाची शिकवण मिळावी, या उद्दिष्टाने पनवेल शहरातील पायोनीयर सोसायटी समोरील स्नेह बिल्डींगमध्ये संस्कार भारती समिती पनवेल यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक नितीन पाटील यांच्या सौजन्याने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्सहित करण्यासाठी बालक बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारामध्ये लहानमुलांनी दिवाळीचे फराळ, पणत्या तसेच विविध पदार्थांची विक्री केली. तसेच नागरीकांनी या बाजारा भेट देत लहान मुलांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले. या वेळी संस्कार भारती पनवेल समितीच्या अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, प्रांत समन्वयक सुनीता खरे, प्रांत कोषाध्यक्ष नीला आपटे, कार्यक्रम प्रमुख जुईली चव्हाण, अपर्णा नाडगौडी, रोहिनी टिळक, मकरंद देसाई, पुजा आंबवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.