झेप फाऊंडेशन’ च्या संस्थापक अध्यक्षा, जि. प. च्या माजी बांधकाम सभापती, सौ. चित्रा आस्वाद पाटील यांना नेल्सन मंडेला पीस अकॅडमी चा पुरस्कार आणि सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी 

चित्रा आस्वाद पाटील सामाजिक कार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कार ने सन्मानित

प्रतिनिधी अलिबाग :– दि . 28 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेल मध्ये झालेल्या बहारदार कार्यक्रमात खा. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमी द्वारे सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा *नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्कार  ‘झेप फाऊंडेशन’ च्या संस्थापक अध्यक्षा, जि. प. च्या माजी बांधकाम सभापती, सौ. चित्रा आस्वाद पाटील यांना बहाल करण्यात आला.

समाजातील केलेल्या विषेश कार्याची दखल घेऊन  जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थेने  आपल्या प्रटोकॉल ने पात्र ,तज्ञ व्यक्ती विशेष अनेक योग्यतेनुसार सन्मानित केले. हा पुरस्कार केवळ पद प्रतिष्ठा म्हणून नव्हे तर प्रत्येकाच्या केलेल्या  कार्याच सन्मान आहे.
देश-विदेशातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार दिला गेला.
या प्रसंगी अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनशी संलग्न असणाऱ्या सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सलन्स सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट तर्फे ‘सामाजिक कार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

यावेळी दुबई स्थित बु. अब्दुल्ला समुहाचे प्रमुख बु. अब्दुल्ला , महाराष्ट्र महसुल विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर, शेख मजीद रशीद अल मुल्ला (सत्ताधारी कुटुंब सदस्य संयुक्त अरब अमिराती सामाजिक कल्याण), मा. डॉ. प्रल्हाद भाई दामोदरदास मोदी (उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ता गुजरात), मा.डॉ. नवदीप सिंग (लंडन, यूके शीख ग्रुपचे संस्थापक), एच.आर.एच. राजकुमारी जॉय पेट्री (जगातील पहिले रॉयल हायपर-रिअलिझम हाताने काढलेले पोर्ट्रेट आर्टिस्ट, दक्षिण आफ्रिका), मा.डॉ.अर्शी झवेरी (रॉयल फॅमिलीचे वरिष्ठ सल्लागार, UAE अबु धाबी), मा. महाराज सारा अब्बास.(संस्थापक आणि सीईओ¬ इव्हॉल्व्हर इंक कॅलिफोर्निया यू.एस.ए.), मा. जयश्री राव (केंद्रीय अन्वेषण ब्यूरो CBI), श्री.करण वर्मा दुबई, UAE, गायिका वैशाली सामंत, कु.शिवांशी श्रीवास्तव(व्यवसाय व्यवस्थापन दुबई), मा. कु. अमिषा पटेल (अभिनेत्री), मा.गुलशन ग्रोव्हर (अभिनेता), चित्रपट दिग्दर्शक राम शंकर, कुस्तीपट्टू मा. तानाजी जाधव, जेपी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालत डॉ. श्री. जयप्रकाश सिंघानीया, व्यावसायिक प्रदिप जगताप आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.