प्रकाश म्हात्रे मित्र मंडळ व आर झुंझुंनवाला शंकराय आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी सोमवारच्या निमित्त लिंगेश्वर महादेव मंदिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा

प्रतिनिधी प्रेरणा गावंड
नवीन पनवेल येथे स्थानिक लिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी नगरसेविका प्रज्योती प्रकाश म्हात्रे यांच्या हस्ते नेत्र शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन पनवेल येथे प्रकाश म्हात्रे यांच्या मित्र मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्य जनसेवेच्या उद्दिष्टाने जनतेपर्यंत लाभ पोहोचवला जातो. त्यांचे कार्य सर्वसामान्यांना न्याय देणारे असल्याने प्रत्येक स्थानिक व्यक्ती त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या विश्वासाने सहभाग घेत असतात
या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश म्हात्रे ,प्रज्योती म्हात्रे ,बबन विश्वकर्मा , डॉ.ऊर्मिला मॅडम, माजी नगरसेवक गोपाळ भगत ,चंद्रकांत गायकवाड ,नाग्या पारधी ,मारुती पाटील, ह-भ-प बाळाराम पाटील, रमेश म्हात्रे, शरद घुले अश्या अनेक व्यक्तींचे सन्मान मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.