जे एम म्हात्रे चारीटेबल संस्था व शिवाजी थोरवे ई-सेवाकेंद्र खांदा कॉलनी यांच्या मार्फत मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर

प्रतिनिधी पनवेल

शिवाजी थोरवे ई-सेवाकेंद्र खांदा कॉलनी यांच्या मार्फत आयोजक गणेश पाटील व शिवाजी थोरवे यांनी खांदा कॉलनी नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांना सोयीसाठी मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित केले होते.

महात्मा शाळा खांदा कॉलनी येथे ठेवण्यात आलेल्या या शिबिराला जे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेचे अध्यक्ष विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व माधुरी गोसावी आवर्जून उपस्थित होते

या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला डोमासाईल दाखला, जातीचा दाखला ,स्थानिक दाखला, पी डब्ल्यू एस दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, नॉन क्रिमिनल दाखला आदी सुमारे पाचशे ते सहाशे दाखले मोफत वाटप होणार असल्याचे आयोजक माजी उप नगराध्यक्ष गणेश पाटील व शिवाजी थोरवे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,महिला आघाडी अध्यक्ष माधवी गोसावी ,नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, नगरसेविका सारिका भगत आदी सह अनेक मान्यवर पालक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.