*पनवेल मध्ये “मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप महाशिबिर”*
प्रतिनिधी पनवेल
“आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीद मनाशी बाळगून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल तसेच रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मधील नागरिकांच्या सेवेसाठी सी. के. टी. महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे “मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप महाशिबिर” आयोजित करण्यात आले होते.
कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सन्माननीय आमदार रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाशिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
या आरोग्य महाशिबिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी ‘मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) बसविण्याचे शिबिर’, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप तसेच लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रकिया शिबिर आदी शिबिरांचा समावेश होता. दिव्यांग बांधवांच्या शिबिरासाठी साधु वासवाणी मिशन, पुणे आणि लहान मुलांच्या आरोग्य शिबिरासाठी सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेले हे आरोग्य महाशिबिर म्हणजे पनवेल मधील नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
पनवेल मधील अनेक लहान-थोरांनी तसेच दिव्यांग बांधवांनी या आरोग्य महाशिबिराला उदंड प्रतिसाद चालू आहे.