लोकप्रतिनिधी च्या नाकर्तेपणा मुळे लाखोंच्या उरण मतदार संघातील कोन ,कसळखंड पासून आपटा रसायनी भागातील प्रवासी वर्गाच जीव धोक्यात
प्रतिनिधी :
उरण मतदार संघातील कोन ,कसळखंड पासून आपटा रसायनी सारख्या मोठ्या औद्योगिक विभागाला जाणारा प्रमुख रस्ता मागील 3 वर्षा पासून अत्यंत बिकट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी भाजपा कडुन त्या महामार्गावर मुंबई गोवा रस्त्याच्या उदघाटनाचे प्रसिद्धी बॅनर झलकवण्यात आले . मात्र कोन ते आपटा मार्गात अपघातात अनेक लोकांचा जीव जात आहे या कडे कोणाचे लक्ष जात नाही . या ठिकाणी अनेक अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रोज चालतात . त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने तांत्रिक खराबी होऊन मेकॅनिकल काम निघत आहे .अनेक दुरुस्ती खर्च रोड कर भरणाऱ्या वाहतूक व्यवसाय करणाऱ्या छोटया मोठ्या उद्योजका वर सतत येत आहे .
अश्या धोका दायक अवस्थेत धूळ मातीत दुचाकी स्वार जीव धोक्यात टाकून अनेक प्रवासी रोज प्रवास करतात .त्यात अंग दुःखी ,पाठीचा आजार सारख्या अनेक त्रासाने त्रस्त असून वैद्यकीय उपचार म्हणून खर्च होत असल्याचे सतत चर्चा असते.
स्थानिकांनी याबाबत उरण मतदार संघातील आमदार ,खासदार,पंचायत, जिल्हा परिषदे यांच्या कडे अनेकदा तक्रारी केल्या. पण तरी सुद्धा हा रस्ता आज पर्यंत कधीच सुरक्षित पणे पूर्ण झाला नाही या बद्दल लोकांन मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे .
०३ एप्रिल रोजी 1036.15 कोटी च्या मुंबई गोवा महामार्गच्या कार्यक्रमात मात्र ह्या रस्त्या बद्दल कुठलिही साधी चर्चा , उल्लेख कोणीही लोकप्रतिनिधी ने रस्ते महामार्ग विभाग केंद्रीय मंत्री मोहदय नितीन गडकरी कडे केला नाही .
लोक प्रतिनिधीच्या व स्थानिक रहदारीच्या जवळील रसायनी औद्योगिक वसाहतीत शेकडो संख्येने कामासाठी असंख्य कामगार,अधिकारी, लोकप्रतिनिधी या औद्योगिक वसाहतीत येत असतात .
त्या औद्योगिक वसाहती मुळे देशाच्या आर्थिक फायद्याचा खूप मोठा वाटा हा रायगड जिल्ह्यातून मिळतो.परंतु जाणीवपूर्वक का होईना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन रस्ता व्हावा यासाठी कुठल्या प्रकारच्या नियोजन केले जात नाही. याबद्दल कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नियोजन होत नाही. त्याचा परिणाम स्थानिक व अनेक प्रवासी कामगार स्थानिक लोकांनां रोज सोसावा लागत आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात या रस्त्यावरील ग्रामपंचायत व आमदार भाजपा कडे असून सुद्धा दुर्लक्षित पणा करत लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक करत असल्याचे आरोप प्रवासी वर्गात सातत्याने रोज आहे.
मुंबई गोवा महा मार्गाच्या कार्यक्रमाचे मोठ्या लोकप्रसिद्धी तुन भूमिपूजन झालेल्या प्रकल्पा मधून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या कोन कसळखंड ,रसायनी,आपटा कडे जाणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांना कधी न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांमधून व्यक्त होत आहे.