आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; मिशन लोकसभा २०२४ साठी भाजप सज्ज-  माजी केंद्रिय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर 

लूट हा महाविकास आघाडी सरकारचा किधर कॉमन प्रोग्राम – माजी केंद्रिय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर 

प्रतिनिधी :-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठे होते पण आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही असा घणाघात करत मिशन लोकसभा २०२४ साठी भाजप सज्ज असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर यांनी आज (दि. १८) येथे आयोजित करण्यात करण्यात आलेल्या पत्रकार सांगितले.

पक्ष संघटना मजबूत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश....माजी केंद्रिय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर 

मावळ लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या उरण, पनवेल, कर्जत विधानसभा संघातील कार्यकर्त्यांशी बुथ कमिटीच्या अनुषंगाने खासदार प्रकाश जावडेकर संवाद साधत आहे. आज त्यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना यावेळी खासदार प्रकाश जावडेकर यांनी, भाजपमध्ये बुथ कमिटीला महत्व असल्याचे सांगत मावळ लोकसभा मतदार संघातील बुथ अधिक सक्षम करण्यासाठी मोहिम सुरु असल्याचे सांगितले. राजकारणाच्या दृष्टीने बुथ जिता तो देश जिता हि महत्वपूर्ण संकल्पना आहे.  त्यामुळे प्रत्येक बुथ सक्षम करण्याची योजना आखण्यात आली आहे.

भाजपचे ३०३ लोकसभेत खासदार आहेत, त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी पक्ष अधिक मजबूत करण्याचा आणि ज्या ठिकाणी खासदार नाहीत त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.