पावसा ने साचलेल्या पाण्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शहरातील नागरी सुविधा मिळाव्यात…..रिचर्ड जॉन (अध्यक्ष खोपोली काँग्रेस),
प्रतिनिधी खोपोली दीं. १५ जुलै २०२२
खोपोली शहरातील समाजमंदिर रोड – सागर प्लाझा समोरील सांड पाण्याचा निसरा व्यवस्थित रित्या होत नाही, त्यामुळे प्राण्यांचा (गुरांचा) दवाखाना येथे पाणी जमा होते,तेच सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीस खूप त्रास होतो. हा त्रास होवू नये म्हणून काँग्रेस पक्षाच्या मागणी वरून , खोपोली नगर परिषद येथील मुख्य अभियंता लगाडे पाहणी करण्यास आले होते, पाहणी करून ही समस्या लवकर मार्गी लावू असे आश्वासित केले.
या वेळेस रिचर्ड जॉन (अध्यक्ष खोपोली काँग्रेस), (युवा अध्यक्ष) ॲड.संदेश धावारे, (इंटक काँग्रेस अध्यक्ष ) अरुण गायकवाड, शाम भाउ विनेरकर आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.