चिंचपाडा गावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा….

पनवेल/प्रतिनिधी — प्रेरणा गावंड 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे. गणेशोत्सवात सुध्दा भक्तांनी आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून नामकरण प्रश्न लावून धरला आहे. चिंचपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय विठ्ठल चाहू केणी यांच्या घरी त्यांचा पुतण्या विजय कान्हा केणी यांनी तर ग्रामस्थ व केपी ग्रुपच्या सहकार्याने हा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहिला तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत हे सिद्ध होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी गणपती बापाची सजावट म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखावे बनवण्यात आलेले आहेत. चिंचपाडा गावातील येथील गोरगरिबांच्या हाकेला धावणारे, नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे वडघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वर्गीय विठ्ठल कान्हा केणी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला दी.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी चिंचपाडा गावातील ग्रामस्थासह आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत युवा कार्यकर्ते त्यांचा पुतण्या विजय कान्हा केणी हे देखील प्रत्येक आंदोलनात सहभागी होत आहेत.

सध्या गणेशोत्सव सुरु असून विजय कान्हा केणी यांनी चिंचपाडा गावातील ग्रामस्थ व केपी ग्रुप यांच्या सहकार्याने विजय यांनी देखील घरगुती गणेशाची आरास दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फलक असलेला देखावा साकारलेला आहे. विमानतळ ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे, त्या ठिकाणचे हुबेहूब चित्र आपल्याला पाहायला मिळते. देखावा पाहिला तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहे हे सिद्ध होते.

विजय केणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गणपती बाप्पा विघ्नहर्ता, बुध्दीचा देवता आहे. आणि बाप्पाने या महाराष्ट्रामधील सरकारला सदबुध्दी दिली आणि नवी मुंबई विमानतळाला नाव दि. बा. पाटील हेच दिले आहे. त्याचबरोबर सरकारने दी.बा पाटील यांच्या नावाची घोषणा करून मंत्रीमंडळात मंजूर केला आहे. तसेच हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे पाठवून तोही मंजूर होईल, हाच देखावा साकारण्याचा मुख्य उद्देश आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.