शरीरशौष्टव स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
पनवेल प्रतिनिधी:
पनवेल-उरण महाविकास आघाडी व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित “गावदेवी महोत्सव २०२२” ला पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी आयोजित शरीरशौष्टव स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक गोपाळ भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, शेकाप युवा नेते किरण दाभणे, शेकाप युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, युवा नेते पराग भोपी तसेच पनवेल-उरण महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रेक्षक उपस्थित होते.