जय हिंद फाउंडेशन संस्थेला हॅप्पी मेन्स क्लब पनवेल सदस्य दानशूर समाजसेवक गिरीश जगे परिवाराकडून दहा हजार रुपये देणगी
प्रतिनिधी :साबीर शेख
रायगड सुपुत्र पनवेलकर समाजसेवक गिरीश जगे( हॅप्पी मॅन ग्रुप पनवेल सदस्य) वाणी समाजातील शेतकरी परिवारातील सर्वसामान्य जीवनशैलीत जगणारे गृहस्थ . खासगी कंपनीमध्ये आयुष्याची आर्थिक बाजू सांभाळत निवृत्ती घेतली पुढे आपल्या पारिवारिक कुटुंबाची जबाबदारी पुढे चालवण्यासाठी सध्या ते एक प्रिंटिंग व्यवसाय करत आहे.
लहानपणापासून देश कार्य देशभक्ती करण्याची इच्छा होती म्हणून अनेक वेळा त्यांनी मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न केले .परंतु त्यांना देश सेवा करण्याची संधी मिळाली नाही.

खारघर येथील जय हिंद फाउंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमात ते आमंत्रित असताना जय हिंद फाऊंडेशनचे देशभरातील आजि ,माजी सैनिकांसाठी असलेले विशेष कार्य पाहून, सैनिक व त्यांच्या परिवाराला भारत सरकारच्या सहकार्या नंतर त्या सैनिकांना आपण भारतीय म्हणून ही सहकार्य करावे या कार्या साठी जय हिंद फाउंडेशन काम करत असते असे समजले.
त्या फाउंडेशनच्या वार्षिक सन्मान सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी जय हिंद फाऊंडेशनचे कार्य पाहून त्यांनी भारतातील आजी-माजी सैनिकांच्या जनकल्याणासाठी देणगी स्वरूपात दानशूर गिरीश जगे व त्यांच्या परिवाराकडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली.
आपले मनोगत व्यक्त करताना मला देश सेवा करण्याची संधी मिळाली नाही परंतु देश सेवा करणाऱ्या अनेक सैनिकांच्या सेवेसाठी मी व माझे परिवार काही तरी करू शकतो म्हणून आज मी जय हिंद फाउंडेशन या संस्थेला ही मदत केली असल्याचं त्यांनी सांगितले.